रविवार, २१ मार्च, २०२१

शीर्षक - भाज्यांची ओळख

 शीर्षक - भाज्यांची ओळख


सारेच म्हणती आम्हां

तुम्ही लहानगी मुलं ,

शांत बसताच म्हणे

वेलीची कोमल फुलं 


आई पाठवी शाळेत

देऊन खाऊचा डबा ,

मधल्या सुट्टीत पाही

फुगीर बटाटा उभा


कधी गवार डूलते

तिखट आणि मिठात ,

कोबीचे मंचुरियन

भिजे मैद्याच्या पिठात


वांग्याचे देठ नेहमी 

वाटते छत्रीचे दांडे ,

मेथीची भाजी सदा

पालक सोबत भांडे


सुरण मात्र दिसते

 कोपऱ्यात एकटे ,

भेंडीचे ते अजूनही

नाकच आहे नकटे


बाजारात गेलो तेव्हा 

माझ्याशी ओळख झाली ,

भाज्यांची गंमत सारी

शांत बसून पाहिली 


*✒️विपुल उत्तम आढाव✒️*

हायकू - उत्तुंग भरारी


*विषय - आकाशी झेप* 


शीर्षक - उत्तुंग भरारी


     *स्वप्न मनाशी*

  *जिद्दीने बाळगावे*

     *स्वयं जगावे... १*


        *निसर्ग देणं*

    *स्वनिर्मित हा गुण*

       *सोडा अवगुण... २*


         *जीवन मूल्य*

       *शिकूया नभापरि*

         *नैतिक सारी...३*


          *आकाशी झेप*

        *धैर्याने चला मारू*

         *आव्हाने सारू...४*


            *यश दिसता*

          *उत्तुंग ही भरारी*

           *सुखाची वारी...५*


*✒️विपुल उत्तम आढाव✒️*

शीर्षक - गौरव भाषेचा (मराठी भाषा दिवस)

 शीर्षक - गौरव भाषेचा...


माझ्या भाषेचा गौरव

तुझ्या अखंड गगनी 

थोडा निश्चल होऊन

तू उधळूनी बघ रे

माझ्या भाषेचा गोडवा

तुझ्या रसाळ जिभेने

जरा संवाद साधून

कधी चाखून बघ रे

माझ्या भाषेचे ते शब्द

तू वापर कर सर्रास

संबंध तो अर्थाचा

जरा सखोल निरख रे

माझ्या भाषेचा अभिमान

काय सांगू या जगाला

विसर पडावा जणू

भाग्य देता या दैवाला


*✒️श्री. विपुल उत्तम आढाव✒️*