शीर्षक - भाज्यांची ओळख
सारेच म्हणती आम्हां
तुम्ही लहानगी मुलं ,
शांत बसताच म्हणे
वेलीची कोमल फुलं
आई पाठवी शाळेत
देऊन खाऊचा डबा ,
मधल्या सुट्टीत पाही
फुगीर बटाटा उभा
कधी गवार डूलते
तिखट आणि मिठात ,
कोबीचे मंचुरियन
भिजे मैद्याच्या पिठात
वांग्याचे देठ नेहमी
वाटते छत्रीचे दांडे ,
मेथीची भाजी सदा
पालक सोबत भांडे
सुरण मात्र दिसते
कोपऱ्यात एकटे ,
भेंडीचे ते अजूनही
नाकच आहे नकटे
बाजारात गेलो तेव्हा
माझ्याशी ओळख झाली ,
भाज्यांची गंमत सारी
शांत बसून पाहिली
*✒️विपुल उत्तम आढाव✒️*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा