हायकू रचना - आनंदी क्षण
आनंदी क्षण
शुभेच्छा वर्षावांनी
भारुनी मन ||१||
मनी दिसावा
स्वप्न पूर्ती सुखाचा
स्वर्ग असावा ||२||
खग तू व्हावे
अमर्याद ऊर्जेचे
पंख लाभावे ||३||
गाठूनी आज
वयाची ती पन्नाशी
सुवर्ण साज ||४||
जीवन पर्व
जग उत्साहपूर्ण
स्वीकार सर्व ||५||
सुख असावे
अनुभव सागरी
तट दिसावे ||६||
अनुभव हे
जीवनी प्रवासात
मार्गी शोध घे ||७||
जग हे विश्व
अनुभव सागरी
सावर अश्व ||८||
देतो मी आज
हा शब्द सुमनांचा
सदिच्छा साज ||९||
मिळावा तुला
तृप्ततेचा किनारा
अपेक्षा मला ||१०||
*✍🏻श्री. विपुल उत्तम आढाव(मुंबई)✍🏻*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा